प्रतिनिधी देऊळगाव राजा
देऊळगाव राजा जवळ असलेल्या ग्राम डोईफोडे वाडी येथे राजेंद्र डोईफोडे यांचे पोल्ट्री फार्म असून या पोल्ट्री फॉर्मवर जवळ पास दोनशेच्या कोंबड्या होत्या त्यातील शंभर कोंबड्या दिनांक 2 जुलै रोजी मृतावस्थेत आढळुन आल्या . शासन धोरणानुसार शेती पूरक व्यवसाय करणारे शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून बकरी पालन कुकुट पालन गुरेढोरे पालनाचा व्यवसाय करतात अशाच एका शेतकऱ्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कोंबडी पालनाचा व्यवसाय ग्राम डोईफोडे वाडी येथे सुरू केला .
यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन सदर चा व्यवसाय त्या शेतकऱ्यांनी सुरू केला मात्र अचानक तीन ते चार दिवस आगोदर सदरच्या पोल्ट्री फार्म वरील शंभर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सदर शेतकरी राजेंद्र डोईफोडे यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर झांबरे यांच्याशी तात्काळ संपर्क करून सदर परिस्थिती बाबत त्यांना कळविले सदर पोल्ट्री फार्म धारकाच्या जागेवर जाऊन पशुसंवर्धन अधिकारी यांनी कोंबड्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर काय परिस्थिती आहे हे आपणास सांगतो असे सांगितले मात्र सदर घटनेमुळे शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून बँकेचे कर्ज फेडण्यासाठी सध्या तो शेतकरी हतबल झालेला आहे
