तालुका प्रतिनिधी देऊळगाव संदीप मस्के
राजा डोईफोडे वाडी येथे ग्रामीण पोल्ट्री फार्म वर शंभर कोंबड्या मयत दिसुन आल्या. राजेंद्र डोईफोडे यांच्या मालकीचा पोल्ट्री फार्म मुद्रा लोन मधून कर्ज मंजूर करून विदर्भ कोकण ग्रामीण बँक देऊळगाव राजा या शाखेतून कर्ज घेऊन पोल्ट्री फॉर्म उभा केलेला सोमवारच्या सकाळी राजेंद्र डोईफोडे पोल्ट्री फार्म वर गेले असतात त्यांना 105 कोंबडी मयत दिसून आली.
आज रोजी सातशे ते आठशे ग्रॅम वजन असून आजच्या किमतीत त्यांचे 25 हजाराची नुकसान झाले असून डॉक्टर डी .सांबरे साहेब यांनी पोस्टमाटम करून मंगळवार पर्यंत अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे डॉक्टर भांबरे साहेब यांनी सांगितले.
