Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

22 वर्षीय तरुण अपघातात ठार

Responsive Ad Here

  सागर रासकर प्रतिनिधी अहमदनगर

       खडका येथील तरुणांच्या कारला अपघात एकजण कजण ठार भिमाशंकर येथे गेले होते दर्शनाला नेवासा तालुक्‍यातील खडका फाटा येथून भिमाशंकरला गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात होऊन त्यात २२ वर्षीय युवा हाटेल व्यावसायिक  अमोल लोखंडे हे जागीच ठार झाले तर इतर चार जण जखमी झाले. 

अमोल लोखंडे याच्या पश्चात आई, वडील, बहीण भाऊ, आत्या, चुलते असा परिवार आहे. शुक्रवार दि.१६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अमोल लोखंडे हे आपले मित्र दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे, मनोज शिंदे, नितीन निपुंगे यांच्या समवेत स्विफ्ट कार ( एमएच ४३ आर ६४२३) ने भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. 

     रात्री ११:३० ते १२:०० वाजण्याच्या सुमारास आळेफाटा ते ओतूर रस्त्यावरील आणे घाटावर पडलेल्या दरडीला ही कार धडकली व पुढे जाऊन उलटली. यामध्ये अमोल लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला तर कार मधील अन्य युवक जखमी झाले. 

जखमींना नगर येथील हास्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले तर अमोल लोखंडे यांचा मृतदेह दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या खडकाफाटा रोडवरील निवासस्थानी आणण्यात आला. शोकाकूल वातावरणात अंत्यसस्कार करण्यात आले. रमेश लोखंडे यांचा अमोल एकुलता एक मुलगा होता. अमोलच्या निधनाने नेवासा शहर व खडकाफाटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.