Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भुसावळ विधानसभेतील शिवसपंर्क अभियानाची वरणगाव येथून सुरुवात

Responsive Ad Here

भुसावळ प्रतिनिधी

  भुसावळ  विधानसभेतील शिवसंपर्क अभियानाची सुरुवात वरणगाव शहरात महिला आघाडी संपर्क संघटिका श्रीमती उषाताई मराठे शिवसेना भवन मुंबई यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ पुनम ब-हाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  प्रसंगी प्रभाग क्रमांक 9 मध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले व शिवसेना बळकटीकरणासाठी तसेच महिला आघाडी सबलीकरणासाठी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले महिलांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा व साहेबांचे विचार घराघरापर्यंत पोचवावे ठाकरे सरकारने केलेली चांगली कामे जनते पर्यंत पोहोचवावी ठाकरे सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात असे प्रतिपादन केले . 

  

    प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी केलेल्या विविध कामांबाबत लोकांसोबत संवाद साधला आणि कोविड -१९ च्या महाभयंकर परिस्थितीत कुटुंबवत्सल उद्धवजी ठाकरे यांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावत महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक अतूट ऋणानुबंध निर्माण केले आणि जनतेचा पित्याप्रमाणे सांभाळ केला कोविड -१९ मध्ये नियोजनबद्ध आरोग्य सेवा  कार्यक्रम राबवून शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण हे ब्रीद सत्यात उतरवले त्याबाबत त्यांचे आभार मानले.  कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे यांनी आपल्या मनोगतात संघटनेचे धोरण व संघटनेचे कार्य सर्व पदाधिकाऱ्यांनी जनते पर्यंत पोहोचवावे व जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन केले प्रसंगी उपजिल्हा संघटक  विलास मुळे भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी उपतालुका प्रमुख  सुभाष चौधरी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे जिल्हा परिषद सदस्य सरला कोळी महिला आघाडी तालुका संघटिका भुराबाई चव्हाण उपतालुका संघटिका योगिता सोनार सौ तृप्ती महाजन भुसावळ शहर प्रमुख निलेश महाजन ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव ब-हाटे , राहुल बावणे ,  सागर वंजारी ,दीपक पाटील , यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते