Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चिखली शिवसेना व युवासेनेच्या वतीने मोबाईल रेंजसाठी शोले स्टाईल आंदोलन संपन्नं

Responsive Ad Here

 देवानंद नेमाने प्रतिनिधी

     अनेक दिवसांपासून चिखली तालुक्यातील नागरिक मोबाईल् रेंज उपलब्धं नसल्याने त्रस्त आहेत त्यामुळे शिक्षण , आरोग्यं , शेती,  या विषयक अनेक उपक्रमांच्या अंमलबजावणीस नागरिकांना त्रास होत आहे. या समस्या नागरिकांनी युवा सेना तालुका प्रमुख नंदु कऱ्हाडे यांना सांगितल्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

चिखली शहराला लागून असलेले खोर, माळशेंबा , अंत्री , वाघापूर , चांधई, गोद्री, पळसखेड दौलत, भोकर या गावांना बरेच दिवसांपासून रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा त्रास विदृयार्थ्यांना जाणवत आहे. आजारपणात तात्काळ सेवा उपलब्धं करुन देणाऱ्या 108 नंबरवरती सामान्य नागरिकांना फोन करता येत नाही. शेती क्षेत्राशी निगडीत कित्येक योजना या ऑनलाईन सेवा उपलब्धं नसल्याने नागरिकांना मिळत नाही. या समस्यांचा पाढा नागरिकांनी शिवसेना सपंर्क कार्यालयात मांडल्यानंतर सर्व शिवसेना नेते यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू कऱ्हाडे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन खोर येथील टावरवर चढून यशस्वी करण्यता आले. यावेळी नंदू कऱ्हाडे यांच्या समवेत शहर संघटक प्रितम गैची, पप्पू परिहार, आनंद गैची , विभागप्रमुख प्रविण सरदड, पंकज हाके, प्रदिप माळोदे ,यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टावरवरती सकाळी १० वाजेपासून ठाण मांडले होते.

तेव्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांणी या ठिकाणी धाव घेऊन तालुक्याचे दंडाधिकारी तहसिलदार येळे साहेब यांच्या मध्यस्तीने कंपनीचे प्रतिनीधी पांडे साहेब यांना धारेवर धरत यशस्वी मध्यस्ती केली. तेव्हा आठ दिवसांच्या आत मोबाईल टावरची फ्रिक्वेंसी वाढविण्यात येईल व येणाऱ्या समस्याचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन संबंधीतांनी दिल्यानंतर टॉवरवर चढलेल्या पदाधिकाऱ्यांनी विनंतीवरुन खाली उतरविण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरुभाऊ खेडेकर, सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे , उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपील खेडेकर

शहरप्रमुख श्रीराम झोरे , युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर , तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर संघटक प्रितम गैची, युवासेना शहर प्रमुख विलास घोलप, उपशहरप्रमुख समाधान जाधव, दत्ता देशमुख, मंगेश ठेंग, शेख बबलु, प्रसिध्दी प्रमुख बंटी कपूर, साजीद भाई, सरपंच दिपक पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर वाघ , पो.पा. सुरेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष  रमेश पाटील, अशोक माहिते, अंकुश डहाके, राजु लोखंडे, दत्ता मैद, सोमनाथ तायडे,  बंन्टी पांडे, वसंता साखरे, राजु बोरे, राजु कारले, जना पाटील, मदन कारले, बाळू कऱ्हाडे, प्रलहद कऱ्हाडे, प्रदिप माळोदे, योगेश डुकरे, गजानन पारवे , दिपक पांडे, प्रदिप वाघ, समाधान मोरे, अमोल मोरे, गोपाल डुकरे, पल्हाद राणा, संजय पवार यांच्यासह असंख्य शेतकरी व विद्यार्थी मित्र हजर होते.