प्रतिनिधी / पाचोरा
पाचोऱ्यात ८५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
पाचोरा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोरा शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल होत आहे. पाचोरेकरांना कार्यसम्राट आमदार लाभला असुन पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाचोरा - भडगाव तालुक्यात एकही काम शिल्लक राहणार नसल्याचे राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पाचोरा व भडगाव शहरात इतके भरीव कामे झालेली आहेत की, याचा इतरांनी हेवा वाटण्याजोगा आहे. मोठ्या शहरांनाही लाजवेल अशी विकास कामे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहेत. यामुळे आमदार किशोर पाटील यांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. ते प्रामाणिकपणे काम करीत असतांना त्या कामाची गरज व आवश्यकता पटवुन आमचे कडुन कामे मंजुर करुन घेतात. ही त्यांची इतरांपेक्षा वेगळी शैली आहे. उर्वरित कामांची त्यांनी आज जी मागणी केली आहे. ते देण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचेही ना. शिंदे यांनी सांगितले.
पाचोरा शहरात ना. एकनाथ शिंदे यांचे सुमारे साडेतीन तास उशिरा आगमन झाले. त्यांना मुंबई येथे परत जाण्याची घाई असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. मात्र वेळे अभावी आमदार किशोर पाटील यांचे प्रास्ताविक आणि ना. एकनाथ शिंदे यांचे केवळ १० मिनिटे झालेले भाषण यावर कार्यक्रम आटोपता झाला. माजी मंत्री स्व. के. एम. (बापु) पाटील व्यापारी भाजी मंडई संकुलात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, कन्नडचे आमदार उद्यसिंग राजपुत, संपर्क प्रमुख संजय सावंत, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णु भंगाळे, तालुका संपर्क प्रमुख सुनिल पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्षा प्रियंका पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, डॉ. प्रा. अस्मिता पाटील, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, न. पा. गटनेत्या सुनिता किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, संजय कुमावत, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, डॉ. प्रियंका पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील व्यासपीठावर होते.
पाचोरा येथे ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते हिवरा नदीवरील कृष्णापुरी, पांचाळेश्वर मंदिराजवळील व स्मशानभूमी जवळील पुलांचे भुमिपुजन, माजी मंत्री स्व. के. एम. (बापु) पाटील व्यापारी भाजी मंडई संकुलाचे लोकार्पण, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण व भडगाव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानंतर ते सायंकाळी ५:५५ मिनिटांनी ते व्यापारी संकुलात हजर झाल्यानंतर कु. आरुषी संजय गोहील व कु. साक्षी किशोर बारावकर यांनी ना. शिंदे यांचे औक्षण केले. पाचोरा शहरातील उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक मुकुंद बिल्दीकर, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संजय कुमावत व प्रदिप पाटील यांचा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. यावेळी नगरसेवक शितल सोमवंशी, रहेमान तडवी, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, सतिष चेडे, आनंद पगारे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, डॉ. भरत पाटील, युवा पदाधिकारी संदिप राजे पाटील, वैभव राजपुत, अनिकेत सुर्यवंशी, मोहीत राजपुत, समाधान पाटील, विशाल राजपुत, जितेंद्र पेंढारकर, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, सुनंदा महाजन, उर्मिला शेळके, स्मिता बारावकर, पदमाबाई महाले, चंदा ठाकरे, रेखा राजपुत किरणताई पाटील सह मोठ्या संख्येने महिला व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी यांनी केले.
*विकास कामांच्या पुस्तिकेचे ना. शिंदे यांचे हस्ते प्रकाशन*
पाचोरा नगर परिषदेने गेल्या चार वर्षांत केलेल्या विकास कामांची पुस्तिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली होती. या पुस्तिकेचे अनावरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार उद्यसिंग राजपुत, गुलाबराव वाघ, डॉ. हर्षल माने, विष्णु भंगाळे, संजय सावंत यांचे हस्ते करण्यात आले.
*डॉ. प्रा. अस्मिता पाटील यांचा भाजपातुन शिवसेनेत प्रवेश*
जळगांव जिल्ह्याच्या भाजपाच्या प्रवक्त्या तथा "बेटी बचाव बेटी पढाव" घ्या राज्य समन्वयक डॉ. प्रा. अस्मिता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी शिवबंधन बांधले. यावेळी भडगाव तालुक्यातील महिंदळे पाचोरा तालुक्यातील शिंदाड व नगरदेवळा येथील मोहन यादवराव पाटील, कैलास भोजराज सावकारे, भिकन नरसिंग जाधव, पुंडलिक भिमराव पाटील, पृथ्वीराज तुळशीराम पाटील, अंकुश सुखदेव सावकारे, नारायण मोतीराम गायकवाड, उत्तम शामराव पाटील, पुष्पांजली मुकेश तांबे, सुनिता सुनिल पाटील, अफसाना अमिर सैय्यद, जोत्स्ना संजय पाटील, अंजली अनिल चव्हाण, प्रतिभा दिनकर पाटील, माधुरी सागर महाजन यांनी ना. एकनाथ शिंदे व ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
