Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रोत्साहन मिळाले मुलांना- केल्या सैनिकांना राख्या रवाना

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

कै य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित मुला-मुलींचे बालगृह खडके बु ता एरंडोल जि जळगाव या अनाथ निराधार मुल आणि मुलींच्या मनात ब-याच दिवसापासून असलेली एक राखी कर्तव्याची ही सुप्त कल्पना आज मैत्री सेवा फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने पुर्ण होत असुन घरदार सोडून  सिमेवर राहुन भारत मातेचे रक्षण करणा-या भारतमातेच्या सुपुत्रांसाठी संस्थेतील बालकांनी प्रत्यकी एक राखी आणि सैनिकांप्रती असलेली भावना व्यक्त करणारे पत्र तयार करुन अधिक्षकांकडे जमा केले .

      पुढे सर्व पाकीट मैत्री सेवा फौंडेशन चे सन्माननीय अध्यक्ष आणि सदस्य यांचेकडे सुपूर्द करण्यात आले असुन ते सैनिकांपर्यत पोहचविण्यास मोलाचे सहकार्य होणार आहे.या आधीही संस्थेतील बालकांनी देशासाठी वीरमरण पत्करलेल्या जवनांना श्रध्दांजली म्हणून एक दिया शहिदोके नाम  असा उपक्रम केला होता.या माध्यमातून बालकांमधे देशभक्तीची भावना जागृत होईल हा उद्देश आहे.

संस्था चालक दादासो.प्रभाकर पाटील  यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिक्षक मधुकर कपाटे;प्रमोद पाटील ;गणेश पंडीत ;तुषार अहिरे ; सौ.अरुणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.