सागर रासकल प्रतिनिधी नेवासा
(ता ६) रामडोह रस्त्याच्या 'पाटचारी परिसरात डोके छित्रविच्छित्ञ केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती समजताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .सोहम खिलारी (वय १०, राहणार बुलढाणा, हल्ली वरखेड, ता नेवासा) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे मयत मुलगा हा गेल्या आठ नऊ वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता. दरम्यान त्याचा मृतदेह आज पहारे रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याचे कडेला छिन्रविच्छित्न अवस्थेत परिसरातील लोकांना दिसला.
या घटनेची माहिती लोकांनी नेवासे पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनस्थळी जाऊन पाहणी केली पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
मयत बारकूचा आर्ड व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात आहे त्याचा स्वभाव खूपच गरीब होता तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यासारखे बाहेरचे कोणीही असण्याची शक्यताच नाही पोलिसांचाही तसाच कयास आहे. खरी माहिती तपासाअंतीच समोर येईल. ...