Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

इमाव आर्थिक विकास महामंडळाचे विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे

Responsive Ad Here

 बुलढाणा प्रतिनिधी

     बुलडाणा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी विविध योजनेचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यासाठी बिजभांडवल योजनेचे 36, थेट कर्ज योजनेचे रक्कम रु. 1 लक्षपर्यंत 133, वैयक्तीक व्याज परतावा कर्ज योजनेचे 85 व गट कर्ज व्याज परतावा योजनेचे 12 चे  उद्दिष्ट प्रप्त झाले आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

  महामंडळाची 20 टक्के बीजभांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातुन राबविण्यात येत आहे. एकूण मंजुर कर्ज रकमेत महामंडळाचा सहभाग 20 टक्के,  बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी सहभाग 5 टक्के आहे. कर्जाची मर्यादा रू. 5 लाख व कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.  थेट कर्ज योजना  ही महामंडळामार्फत राबवली जाते. कर्ज मर्यादा रू. 1 लाख आहे. लाभासाठी अर्जदाराचा सिबल क्रेडीट स्कोअर किमान 500 आवश्यक आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. नियमीत कर्ज परतफेड करणा-या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. 

   वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. कर्ज मर्यादा रू.10 लाख (ऑनलाइन ) महामंडळाच्या वेब पोर्टलवर नाव नोंदनी आवश्यक आहे. कर्ज रकमेचे हप्ते नियमीत भरल्यास व्याजाची रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळा मार्फत जमा करण्यात येईल. कुटूंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.8 लाख पर्यंत असावी. अर्जदार इतर मागास प्रवर्गातील  असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एकत्रित कुटूंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षीक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा, वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्र निकषात बसणाऱ्या अर्जासाठी व अधिक माहिती तसेच अटी/ शर्तीसाठी आधार कार्ड,  जात प्रमाणपत्रासह जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262-248285 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. बुलडाणा यांनी केले आहे.