तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा
मांजरसुम्भा बीड येथे आज मराठवाडा विभागातील मनसे जिल्हा अध्यक्ष यांचा स्नेह मेळावा झाला.कोरोनाच्या या भयंकर संकटामुळे गेली 1 वर्ष कोणाचीही भेट, बोलणे झाले नव्हते. परंतु सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी यांच्यासह आपापल्या भागात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत करत होते, या कोरोनामुळे अनेकांनी आपले नातेवाईक गमावले,,त्यामुळे सर्वांशी चर्चा करण्यासाठी तसेच सहकार सेना, शेतकरी सेना याबाबत चर्चा करण्यासाठी, तसेच आगामी येणारी,महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती,निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांबेकर, संभाजीनगर जिल्हा सुहास दाशरथे,अध्यक्ष दिलीप बनकर, जालना जिल्हा अध्यक्ष बळीराम खटके,जिल्हा अध्यक्ष गजानन गीते, जिल्हा अध्यक्ष प्रकाश बापू सोळंखे, परभणी जिल्हा अध्यक्ष शेख राज, जिल्हा अध्यक्ष गणेश सुरवसे, बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे, जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, जिल्हा अध्यक्ष वैभव काकडे, जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट,जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे,जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ नरसिह भिकाने इत्यादी उपस्थित होते,,
