गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोलला समस्त माळी समाजाने तहसिलदारांना दिले निवेदन
एरंडोल येथिल माळी समाजाच्या वतीने तहसीलदार अर्चनाताई खेतमाळीस यांना ओबिसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद. नगर परिषद. महानगरपालीका मध्ये मिळणारे आरक्षण पूर्ववत करावे तसेच " ओबीसीं '' संवर्गातील जातींची जनगणना करावी.या प्रमूख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना एरंडोल चे माजी नगराध्यक्ष भाऊसो.देविदास महाजन* यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करणे म्हणजे ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे.राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून हा अन्याय दूर करावा अशी मागणी केली. तसेच आण्णासो. विजय महाजन यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी राजेंद्र महाजन,जयराम माळी,दुर्गादास महाजन,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन ,माजी नगरसेवक रुपेश माळी,प्रकाश महाजन,संजय महाजन,नगरसेवक अतुल महाजन ,कैलास महाजन,लक्ष्मण महाजन,पी.जी.चौधरीसर, नगरसेवक कूणाल महाजन,प्रल्हाद महाजन,प्रविण महाजन,प्रशांत महाजन,दिपक महाजन,अॅड आकाश महाजन,राजधर महाजन,पंकज महाजन,उमेश महाजन,दिनेश चव्हाण,जितेंद्र महाजन, पीयूष चौधरी, तुषार महाजन,मनोज महाजन ,हिंमत महाजन,अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.या प्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते.लवकरच पूर्ववत राजकीय आरक्षण न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
