राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
मंठा तालुक्यातील तळणी येथील माऊली अर्बन को. आॅपरेटिव्ह सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सतीष भाऊ निर्वळ यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी भा.ज.पा.जेष्ठ कार्यकर्ते गजानन देशमुख, दारासिंग चव्हाण, माजी सरपंच दिलीपराव सरकटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे,भा.ज.पा.चे नितीन सरकटे, ग्रमपंचायत सदस्य अरूण राठोड,अशोक राठोड प्रहार ता.अध्यक्ष रितेश चंदेल, वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल मगर,यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमा प्रसंगी तळणी येथील कोव्हिड योध्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात सर्व पत्रकार,खाजगी व सरकारी डॉक्टर, अंगणवाडी सेविका,मदतनिस ,आशा वर्कर,मेडीकल चालक व्यापारी,दुधविक्रेते,राशन दुकानदार,भाजी विक्रेते अशा अनेक लोकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
वेळी ह.भ.प.भगवान सरकटे व सतीष जकवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन बॅंकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व गावात माऊली अर्बन बॅंकेच्या माध्यमातून उद्योजक बनावे अशी अपेक्षा व्यक्त करुन पुढील भावी जीवनात या बॅंकेची प्रगती होत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली व शुभेच्छा दिल्या. शेवटी माऊली अर्बन बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे ता.अध्यक्ष सतीश निर्वळ यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की ही बॅंक माझी नसुन सर्वांची आहे.या बॅंकेच्या माध्यमातून उद्योजक, व्यापारी तसेच नवतरूण व्यसाईकासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही देतो असे सांगितले.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंठा तळणी येथील सर्व बॅंकेचे शाखाधिकारी, कर्मचारी व माऊली इंग्लिश स्कुलच्या शिक्षक वृद्धांनी परीश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि चव्हाण यांनी तर आभार अमोल मस्के यांनी मानले.यावेळी गावातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
