अम्बड़ प्रतिनिधी हारे
सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत राज्यभर बैठकांचे सत्र सुरूच
सकल मराठा समाजाची ३ जुलै रोजी, सकाळी-११ वाजता,शहागड पैठण फाटा येथे बैठक होणार आहे, या बैठकीला छत्रपती युवराज संभाजी महाराज मार्गदर्शन करणार आहेत. सध्या छत्रपती युवराज संभाजी महाराज,मराठा मुख्य मागण्या मान्य सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने मोठा संघर्ष करत आहेत.
जिल्ह्या जिल्ह्यात जावून महाराज सध्या बैठका घेऊन मराठा समाजात एकजूटीसाठी जनजागृती करत आहेत आणि मराठा समाजही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे व राजेंच्या पाठीशी सकल मराठा समाज एकवटला आहे.
शहागड येथील बैठकीतही छत्रपती युवराज संभाजी महाराज सकल मराठा समाजाला पुढील दिशा बाबत मार्गदर्शन करणार आहेत,असे मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितले आहे.
