अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाट
दि.२ रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन आज दि २ जुलै च्या निमित्ताने माननीय आकाश भाऊ सिरसाट समाजकल्याण सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद वेगवेगळ्या गावातील ३०० ग्रुप दिला.
विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जखमी सैनिकांच्या उपचारासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सामान्य जनतेला याचा उपयोग होईल.या कारणाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे रक्तदानाच्या दिवशी तुडुंब अशा रंगांच्या रांगा रक्तदान करायला करण्यासाठी उभ्या होत्या. अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी व्हावे असे आकाश दादा सिरसाट यांनी आवाहन केले होते.
रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस मंडळाचे कार्यकर्ते आणि डॉक्टरांची तुकडी कार्यरत होती. रक्तदात्यांची पूर्वनोंदणी करून त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि इतर तपासण्या सध्या सुरू आहेत. आज हजारहून अधिक रक्तदात्यांनी नोंदणी केली. अकोला भीमनगर विशाखा बुद्धविहारामध्ये आयोजन करण्यात आले होते.एकूण २० रक्त स्वीकारणारे विभाग तयार करण्यात आले होते.
१० डॉक्टरांची तुकडी यावेळी सज्ज होती, तसेच ३०० ग्रुप मोरगाव भाकरे व उमेश भाऊ सिरसाट मित्रमंडळ,मयूर भाऊ जंजाळ, मिलिंद जंजाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात खुप काही प्रमाणात रक्तपेढींचा सहभाग झाल्याची असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
