जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर शहरात गेल्या पंधरा दिवसापासून रात्री-बेरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले असून त्यामुळे गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे पहूर शहर अतिसंवेदनशील आहे तेव्हाही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आपणास वारंवार लेखी व तोंडी सूचना केली तरी अजून सुधारणा होत नाही.
शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गोरगरीब जनतेला मच्छरांचा त्रास होत आहे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व आपले कर्मचारी जबाबदार राहतील अशा प्रकारचे निवेदन आज सकाळी दहा वाजता शहरातील सर्व पक्ष पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना निवेदन सादर केले यावेळी रामेश्वर पाटील शंकर जाधव उपसरपंच राजू जाधव ग्रामपंचायत ईश्वर देशमुख संदीप बेढे भारत पाटील पत्रकार गणेश पांढरे रामभाऊ बनकर नटराज गोयर यांच्यासह गावातील राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
