Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विश्व हिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाचे संयुक्त निवेदन

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी

              वारी विरोध ,वारकऱ्यांवर अत्याचार,भागवत धर्माच्या पताका चा अपमान व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालय नांदुरा या ठिकाणी भजनी आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आसमानी संकटाचा फायदा घेत पोलिस प्रशासनाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवुन केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे.भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपारिक गणवेश उतरवायला लावणे हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भागवत धार्मिक पताकाची अवहेलना करणे, आदरणीय ह.भ.प. निरपराध संतांना अटकने त्यांना अपराध्याची वागणूक देणे. जागोजागी वारकऱ्यांची अडवणूक करणे त्यांच्या वर प्रशासकीय बळगा दाखवून अत्याचार करणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. याकरिता विश्व हिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदाय व भाजपा कार्यकर्ते याद्वारे भजनी आंदोलन करण्यात आलेलेआहे.संविधानाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही.

     याकरिता आमच्या प्रशासनाकडे काही मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे:-

१) ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे.

२) आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव वारकरी सप्ताह कीर्तने प्रवचने दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावे, जसे कार्यालयात,बस प्रवासात,थियटर किंवा हॉटेलमध्ये ५०% उपस्थिती ला मान्यता दिली आहे तशी या अनुष्ठानांना अनुमती द्यावी.

३)  सर्व हिंदू मंदिरे तात्काळ उघडण्यात यावी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मा. मुख्यमंत्र्यांनी सरकारी पूजेसाठी पंढरपुरात येऊ नये.

राज्य सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा याआधी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन दिलेला आहे.या आंदोलनाला नंतरही साधुसंतांची वारकऱ्यांची होणारी अवहेलना न थांबल्यास महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या ६०% इतका असलेला वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.

    निवेदन देतांना ह.भ.प.मधुकर महाराज साबे,ह.भ.प.योगेश महाराज कोळस्कार,ह.भ.प.रामभाऊ महाराज झांबरे व इतर तसेच भगवान तायडे(बजरंग दल) सुशील कोल्हे(बजरंग दल),जितु मोरे(हिंदू जण जागृती समिती),सौ. सारीका राजेश डागा(भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा नांदुरा),ब्रम्हानंद चौधरी,प्रशांत संभारे,धनंजय वतपाळ, तानाजी वणारे, वैभव कापळे, राहुल ढवळे,आकाश वकटे,निलेश वसोकार,अतुल बोरसे,विशाल बग्गन,उमेश ताकवाले व इतर बजरंगी उपस्थित होते.व ह.भ.प.रामभाऊ महाराज झांबरे यांनी मार्गदर्शन व सरकार ला उग्र आंदोलनाचा इशारा देत मंदिरे उघडा असे आव्हाहन केले.