Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथील हनुमान मंदिराला वडिलांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ दिली घंटा भेट

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

         - एरंडोल येथील गांधिपुरा भागातील हनुमान मंदिराला गांधीपुरा भागातल रहिवाशी व सध्या मुंबई येथील स्थायिक तसेच किर्गिस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ २० किलो वजनाची शुद्ध पितळाची घंटा भेट म्हणुन दिली.तसेच याआधी त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १ लाख रुपये दिले होते.

    दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता गांधी पुरा भागातील हनुमान मंदीरात देवेंद्र साळी व त्यांचे छोटे बंधु संदिप साळी यांच्या हस्ते घंटेचे विधिवत पुजन करण्यात आले.यावेळी सर्वांनी हनुमंताची आरती केली.यावेळी बोलतांना देवेंद्र साळी यांनी आपल्या लहान पणाच्या आठवणी सांगितल्या व गेल्या वर्षी त्यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश साळी यांचे कोरोना या आजाराने निधन झाले होते.त्यांच्या आठवणीत सदर घंटा मंदिरास भेट म्हणुन देत असल्याचे सांगितले.यावेळी ते भावुक झाले होते.

       याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,जेष्ठ पत्रकार आल्हाद जोशी,बजरंग ट्रेडर्सचे बाळु चौधरी,सामाजिक कार्यकर्ते दशरथ चौधरी,चिंतामण पाटील,संजय पाटील,माजी नगरसेवक सुनील चौधरी, प्रदिप मराठे,गणेश साळी,प्रमोद बडगुजर,शरद पाटील,पवन पाटील,दिनेश घुगे आदी उपस्थित होते.