हिवरखेड जितेश कारीया
हिवरखेड मध्ये तरुण पिढी ७५,℅ दारूच्या आहरी
हिवरखेड या गावात आधी विद्यार्थ्यांना शाळेतुन आल्यानंतरही घरी आई वडील शिक्षण देत होते संध्याकाळी गावातील मंदिरांनमध्ये हरिपाठ, हनुमान चालिसा , विविध धार्मिक ग्रँथाचे वाचन आयकायला मिळत असत परंतु सध्याच्या या आधुनिक वैद्न्यानिक जीवनात जेव्हापासून महागडे मोबाईल आले तेव्हापासून मुलाच्या पित्याच्या खिशाला मोबाईलची कपाती लागली व प्रत्येक लहान मोठे मुलं हे महागडे मोबाईल हाताडतांनी दिसून येत आहेत.
तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे शाळा कॉलेज बंद झाले, मंदिरे सुद्धा बंद झाल्याने विद्यार्थ्यांनचे शिक्षण हे नावानेच शिक्षण झाले आणि आई वडील आपल्याच कामात मग्न असल्याने मुलाना ,विद्यार्थ्यांना शालेय व सांस्कृतिक बाबतीत विचारण्यासाठी गुरूजी मनुन विचारणा सुद्धा कोणी करत नसल्याने मुले हे मनमानिपणा करायला लागली असून बरेच तरुण मुलं ज्यांचे वय हे शिक्षण ,नोकरी, धार्मिक, सामाजिक कार्य, हसण्या खेडण्या सारखे वय असून ते तरुण युवक मोठ्या प्रमानात ,दारू, सारख्या वादग्रस्त बाटलीवर प्रेम करत आहेत.
दारू नसली तर बऱ्याच युवकांचे हातपाय काम करत नाहीत असे त्यांना वाटते, युवकांनि बऱ्याच चांगल्या गोष्टी सौडुन वाईट मार्ग निवडल्याने अनेक कुटूंबियांनवर बिकट परिस्थिती जन्म घेत आहे, अशा या मुलांच्या वागण्याने व सवयीने या पुढे मोठं मोठ्या वादा समोर पाल्याना यावे लागेल , या घटनेला थांबवण्याची मागणी सुजाण नागरिक करीत असून शालेय विद्यार्थी व इतर मुलांना शालेय शिक्षण देऊन धार्मिक , सांस्कृतिक धळे देण्याची आवश्यकता आहे. शासनाने शाळा सुरू करून शिक्षकांन जवळून कडक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यांच्या मागणीसह बंद मंदिरे उघडे करण्याची मागणी येथील सुज्ञ नागरिक करीत आहेत.
प्रतिक्रिया
तरुण पिढीने वेसनाच्या नांदी लागून वेळ वाया घालण्यापेक्षा आईवडिलांचे , समाजाचे ऋण फेडून देशभक्ती करावे -संदिप इगळे ग्रामीण व आदर्श पत्रकार संघाचे जिल्हा सचिव हिवरखेड