शेख सज्जाद शेख प्रतिनिधी लोणार
लोणार तालुक्यातील शारा येथील रहिवासी गजानन वरकड यांच्या वेणी शिवारातील शेतात डहरणीचे काम चालू असताना विद्युत पोलवरून विद्युत कंरट जमिनीत उतरल्याने विद्युत शॉक लागून दोन बैल जागीच ठार झाले असल्याची घटना 20 जुलै रोजी घडली आहे
शारा येथील रहिवाशी गजानन वरकड यांच्या वेणी शेत शिवारात डवरणी चे काम चालू असताना शेजारीच असलेल्या विद्युत पोलवरून तणनाव्याद्वारे करंट जमिनीत उतरल्याने करंट लागून डव्हरणी चालू असताना दोन बैल जागीच ठार झाले असून दोन जणांना विद्युत करंट लागून त्यांना फेकल्या गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे सदर घटने बाबत तक्रार गजानन वरकड यांनी मेहकर पोलीस स्टेशन ला दिले असून मेहकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी वडतकर,टेकाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटणेचा पंचनामा केला असल्याची माहिती गजानन वरकड यांनी 21 जुलै रोजी दिली विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी गजानन वरकड यांनी केली आहे
