Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे ओ.बी.सी.आरक्षण पे चर्चा कार्यक्रम संपन्न.

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

            एरंडोल येथे ओबीसी आरक्षण पे चर्चा हा कार्यक्रम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.संत सेना महाराज सभागृहात संपन्न झाला.याप्रसंगी बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी आरक्षणाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शेलार साहेब, माजी नगरसेवक विजय महाजन,नगराध्यक्ष रमेश परदेशी,भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी,बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सुर्यवंशी,भारती कुमावत यांची समयोचित भाषणे झाली. शहराध्यक्ष सागर महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी केले.

      यावेळी मुंबई हायकोर्टाचे अॅड.प्रतीक कर्डक,समता परिषदेचे संपर्क प्रमुख अनिल नळे, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,गोपाल शामू पाटील,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,संजय महाजन,प्रा.जी.आर.महाजन,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतिष महाजन,नितीन कापडे,आरती शिंपी,रामभाऊ गांगुर्डे,अतुल महाजन,नगरसेवक कृणाल महाजन,राजेंद्र महाजन,प्रमोद महाजन,कैलास महाजन,संजय चौधरी,अरुण पाटील,सदाशिव पाटील,कुणाल पाटील, अरुण साळी, आर.डी.चौधरी,सुनिल महाले,देवराम सोनवणे, अशोक गांगुर्डे,शांताराम सोनवणे,तुषार शिंपी, विजय देशमुख, अनिल महाजन,संजय कुंभार, कविराज पाटील,दिनेश महाजन,मुरलीधर शिंपी, रविंद्र बोरसे,रतिलाल कुंभार, दगडू सोनार,गोपाल कुंभार,मधुकर बोरसे,नरेंद्र महाजन,प्रमोद चौधरी,किशोर सुर्यवंशी यांच्यासह ओबीसी समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अरुण महाजन,कार्याध्यक्ष गजानन महाजन, प्रल्हाद महाजन, शहराध्यक्ष सागर महाजन,कमलेश महाजन,गणेश महाजन,पवन महाले, अजय देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.