गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संचलित एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूल या शाळेचा इ.10 वी चा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे व शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.सदर परीक्षेत प्रवीण देवराम बारेला या विद्यार्थ्यांने 85% गूण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.संदिप कीशोर महाजन हा विद्यार्थी 80% गूण मिळवून द्वितीय क्रमांकां ने उत्तीर्ण झाला आहे.सदर विद्यार्थ्यांनी विपरित परिस्थितीत अभ्यास करुन हे यश प्राप्त केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन शालेय समितीचे चेअरमन अरुणकुमार माळी व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनोद जाधव वर्ग शिक्षक एस.पी.माळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
