Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रेल्वे पुलाचे बांधकाममुळे गावांचा संपर्क तुटला

Responsive Ad Here

प्रतिनिधी मलकापूर 

 बहापुरा येथील रेल्वे गेट नंबर 13 येथे प्रशासनाने फाटक बंद करून रेल्वे पुलाचे बांधकाम केल्यानंतर वाहतूक सदर पुलाखालून काढली परंतु सदर पुलाचे काम चुकीचे  झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग बरोबर ना काढल्याने त्या ठिकाणी पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात जमा झाल्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे पानेरा वर्धा सावरगाव इसर खेड जिगाव टाकळी मामुलवाडी हिंगणे गव्हाड पूर्णा काठावरील गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा सोयीचा मार्ग आहे मात्र रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून वेगळे पुलाचे बांधकाम केल्यानंतर वाहतुकीचा मार्ग हा पुलाखालून काढताना योग्य प्रकारे न कळल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा विसर्ग होत नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी थांबत आहे.

      त्यामुळे गावातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत असून या ठिकाणी सात असलेल्या पाण्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे तर एन पेरणीच्या दिवसात पाणी तुंबत असून गावांचा संपर्क तुटला आहे. पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणे धोक्याचे असून काही नुकसान झाल्यास रेल्वे प्रशासनाची जबाबदारी राहील ह्याची नोंद घ्यावी.  अशा आशयाची तक्रार शेतकरी राजेश अंबुसकर व सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ वाकोडे यांनी केली