Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

"MPSC हे मायाजाल आहे" पुण्यातील स्वप्नील चे स्वप्न राहिले अपूर्ण !

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

       कल्याणी वाघमोडे यांनी दिली लोणकर कुटुंबाला सांत्वनपर भेट ,सरकार व MPSC प्रशासन वर नाराजी !  पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी  नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडे चार वाजता फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. 

MPSC हे मायाजाल आहे ,असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या 24 वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. स्वप्नीलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. 

    स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडीलांना खबर दिली. त्यानंतर त्यास रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषीत केले.

स्वप्नील शिक्षण पुर्ण झाल्यापासून "एमपीएससी'च्या परिक्षेची तयारी करीत होता. तो "एमपीएससी'च्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दिड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला, कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

स्वप्नीलच्या या आत्महत्येमुळे एम पी एस सी च्या रखडलेल्या परीक्षांचा प्रश्न किती तीव्र बनलाय हे पुन्हा एकदा दिसून आलंय. स्वप्नीलला दहावीत 91 टक्के मार्क मिळाले होते तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी होत होता. कोविड योद्धा म्हणून त्याने उत्तम कार्य केले होते .एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो की गावाकडे घर बांधण्यासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे असं स्वप्नीलच स्वप्न होतं. मात्र मागील दोन वर्षांत परीक्षाच झाली नाही तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत गेला असं स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधे म्हटलयं. 

स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांच्या पत्नी असे दोघेजण संबंधीत व्यावसाय पाहतात. साप्ताहिक अहिल्याकिरण च्या संपादक व क्रांती शौर्य सेने च्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी लोणकर कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली . साप्ताहिक अहिल्याकिरण चे प्रिंटिंग लोणकर कुटुंबीय अनेक वर्षा पासून  करत होते .या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .याचा पाठपुरावा करून स्वप्नील चे वडील यांना धीर देत या विषयावर अधिवेशन काळात लक्षवेधी व्हावी ,या संदर्भात पाठपुरावा केला . स्वप्नील च्या मृत्यू ने आता तरी MPSC प्रशासन व सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी ,असे मत व्यक्त करत नाराजी वर्तवली .तसेच याची दखल सरकार ने घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार,असा विश्वास कल्याणी वाघमोडे यांनी सुनील लोणकर यांना दिला .