Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

9 ऑगस्ट क्रांती दिनी भव्य धरने यशस्वी करा- अमृत महाजन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी चोपडा

  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाचा फरक द्या कामगारांची मागणी ची मागणी 

   तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघचा मेळावा रुखनखेडा येथील काम्रेड रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आ ला त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन महासंघाचे राज्य सहसचिव तथा आयटक चे उपाध्यक्ष का अमृत महाजन यांनी केले. ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई प्रचंड प्रमाणात वाढवत असून त्याच्या फटका ग्रामपंचायत व असंघटित शेतकरी शेतमजूर महिला कामगारांना बसत आहे.ते होरपळून निघत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकार जुमानत नाही कामगार कायद्यात दुरुस्ती करून कामगार सहिता सरकार ला दत आहे आणि दुसरीकडे कामगारांना पगार मिळत नाही.. म्हणून शेतकरी कामगार संघटनांतर्फ  येत्या नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे मोर्चे ,जेलभरो, मानवी साखळी, असे आंदोलन केले जात आहेत .जळगाव जिल्हा आयटक व  किसान संघर्ष समितीतर्फे सुद्धा 9 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आयोजित केले आहे.

    या धरणे आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी केले  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट २०२० पासून जी आर काढला परंतु बारा महिन्यापासून अंमलबजावणीच केलेली नाही फरकही दिला नाही तसेच आशा वर्कर यांना दोन हजार रुपये मानधन वाढ एप्रिल 21 पासून मिळालेले नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या थांगपत्ता लागत नाही. त्यांना वारंटी/ गॅरेंटी संपलेले मोबाईल वापरावे लागत असून इंग्रजी भाषेत पोषण ट्रॅकर त्यांच्यावर लादली जात आहे. या सर्व प्रश्नांच्या पाठपुरावा करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी/कामगारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले... *या  मेळाव्यात तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी रमेश पाटील कार्याध्यक्षपदी अशोक गायकवाड उपाध्यक्ष अमोल महाजन सचिव महेंद्र धनगर सहसचिव राजेंद्र धनसिंग पाटील खजिनदार नितीन सोनार सदस्य सर्वश्री सिकंदर तडवी ,प्रवीण कोळी ,आत्माराम पाटील ,प्रकाश रल ,मुकेश पावरा, शेखर डावकर ,शांताराम पाटील तसेच राज्य समिती सदस्य सुभाष कोळी* अशा निवडी करण्यात आल्या सरतेशेवटी डाव कर यांनी आभार मानले