प्रतिनिधी नाशिक
नेहरु युवा केंद्र,नाशिक यांच्यातर्फे स्वच्छता पंधरवाडा हा कार्यक्रम क्रांती दिनाचे औचित्य साधत पुण्यश्लोक अहिल्याबाईं होळकर घाट अंगणगाव येथे घेण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रीय युवा स्वयंमसेवक रविंद्र बिडवे यांनी युवकांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबवली.
यावेळी उपस्थितांना स्वच्छता ची शपथ देऊन स्वच्छते विषयी तसेच क्रांतीदिनाविषयी माहिती रविंद्र बिडवे यांनी सांगितली.यानंतर पु़ण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुत़़ळ्याची स्वच्छता करुन निंबाजी फरताळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमास नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, कोषाध्यक्ष सुनील पंजे,दिलीप आहेर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी संदिप बर्शिले, निंबाजी फरताळे,गोरख कोटमे,भुषण बिलोरे,साई आरगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
