Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार येथील शिवसैनिक आक्रमक

Responsive Ad Here

मो.असलम परवेज तालुका 

    नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध

मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करून लोणार येथे निषेध आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आले होते.

                    सोमवारी महाड येथे राणे यांनी "मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती" असे विधान केले होते. या विधानाबद्दल राज्यभरात राणे यांच्याविरुद्ध शिवसैनिकांच्या वतीने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली होती. लोणार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रकारे आंदोलन करून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी नारायण राणे यांना धडा शकविण्याचा इशारा दिला तसेच लोणार पोलिस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक शरद अहेर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. 

                      

      यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी, युवा सेना शहर प्रमुख गजानन मापारी, शिवसेना तालुका उपप्रमुख भगवान पाटील सुलताने, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दीपक दुधमोगरे, विद्यार्थी सेना शहर प्रमुख सुनील मापारी, राहुल मापारी, शेख रफिकभाई, लुकमान कुरेशी, गणेश मापारी, विठ्ठल मापारी,प्रतापभालेराव,प्रविनआसाबे,पवन हिवाळे, संतोष घायाळ, वैभव कायंदे, संदीप शिंदे, विशाल जाधव,सागर सिरसाट, संजय घायाळ,दीपक हांगे, प्रमोद मापारी व इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.