Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अवयवदान मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांची महत्वाची भूमिका - डॉ . नरेंद्र ठाकूर

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     एरंडोल येथे सूर्योदय  ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संघ आयोजित " अवयवदान सर्वश्रेष्ठ दान " या विषयावर सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी दिनांक ३० जुलै रोजी  मुक्त संवाद  साधला.आज भारतात ५ लक्ष गरजू रुग्णांना अवयवांची गरज असून दर दहा मिनिटाला एकाची प्रतीक्षा यादी मध्ये नोंद होत असल्यामुळे मेंदू मृत होणाऱ्या रुग्णाच्या अवयवदानाची टक्केवारी वाढविण्याची आज गरज आहे . 

    आज भारतात प्रत्येकी सात नागरिकानंतर एक नागरिक हा ज्येष्ठ नागरिकाच्या संज्ञेत येत असल्यामुळे व सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात हे संघटन संपूर्ण देशात उकृष्ट कार्य करत असल्यामुळे ग्रामीण  समाजजीवनात अवयवदानाबद्दल जे गैरसमज , धार्मिक अंधश्रद्धा , भीती , अप्रप्रचार आणि अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी अवयवदूत म्हणून व कुटुंबातील सदस्यांपैकी जर कोणी मेंदू मृत अवस्थेत अवयवदान करणेसाठी   पात्र असेल त्यावेळेस  संमती देऊन अवयवप्रत्यारोपणाच्या माध्यमातुन ८ गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी  ज्येष्ठ नागरिक हे प्रभावी पणे हातभार लावू शकत असल्यामुळे अवयवदान मोहिमेसाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन सुखकर्ता फाउंडेशन चे डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी केले.

      याप्रसंगी संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेल्या पुस्तक वाचनालयाचे उदघाटन डॉ . नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .सौ.सरला विंचूरकर या यकृतदात्या महिलेनेही स्वानुभव विषद करून जिवंतपणी अवयवदान केल्यानंतर तब्येतीवर कुठलाही प्रतिकूल परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले.सौ.सरला विंचुरकर या यकृतदात्या महिलेचा व वाचनालयासाठी देणगी देणाऱ्याचा सत्कार संघाचे अध्यक्ष अरुण माळी , चिटणीस विनायक कुलकर्णी , उपाध्यक्ष जाधवराव जगताप यांनी केला .

कवी निंबा बडगुजर , सुपडू भांडारकर , पी . जी . चोधरी , गणेश पाटील , नामदेव पाटील , विश्वनाथ पाटील , भगवान महाजन , जगन महाजन , प्रा . शिवाजीराव अहिरराव , जगदीश ठाकूर , कुंदन ठाकूर , आरती ठाकूर , नीलिमा मानुधने ,डॉ   प्रशांत पाटील ,  पदमाकर विंचूरकर ,राहुल शिंदे , शेखर बुंदेले , , पवन गवळी यासह अनेकांची उपस्थिती याप्रसंगी होती .


संघाचे अध्यक्ष अरुण माळी यांनी संघाच्या विविध उपक्रमाबाबत अवगत केले . सूत्रसंचालन विनायक कुलकर्णी तर आभार प्रदर्शन  निंबा बडगुजर यांनी केले .✍️✍️✍️ गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी