Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अकोला जिल्ह्यातील 'पहिली वारकरी' रुग्णवाहिका रुग्णसेवेत सेवेत दाखल

Responsive Ad Here

जितेश कारिया प्रतिनिधी हिवरखेड

  आ.अमोल मिटकरी यांच्या निधीतून हिवरखेड येथे वारकरी रुग्णवाहिका

         अखिल भारतीय पत्रकार संघाच्या मागणीला यश

हिवरखेड ही विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे आणि हिवरखेडला शेकडो खेडी लागून असल्याने हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता होती. रुग्णवाहिके अभावी अनेक रुग्णांना आपल्या जिवाला मुकावे लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने    रुग्णवाहिका अत्यावश्यक असल्याबाबत अनेकदा  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघांने वृत्त प्रकाशित केले होते पत्रकार  संघटनेचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार,राजेश पांडव, संदीप इंगळे,, धीरज बजाज, सूरज चौबे, राहुल गिर्हे, जितेश कारिया, जावेद खान, उमर बेग, अनिल कवळकार,  डॉ आनंद भराटे, डॉ स्नेहा सावंग सह जागरूक नागरिकांनी हा मुद्दा सातत्याने रेटून धरला होता. 

   हिवरखेड येथील आरोग्याचा विषय महत्त्वाचा असल्याने विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी स्थानिक विकासनिधी मधून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त कै.ह.भ.प विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 'अकोला जिल्ह्यातील पहिली 'वारकरी रुग्णवाहिका' हिवरखेड येथील लोकार्पण कार्यक्रमांमध्ये रुग्णसेवेसाठी समर्पित केली. वारकऱ्यांच्या नावाने समर्पित केलेली ही एकमेव रुग्णवाहिका असून निश्चितच या माध्यमातून आरोग्य सेवेचा वसा आणि वारसा जपला जाईल असे प्रतिपादन यावेळी लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी व्यक्त केले.

    अध्यात्माचा संगम वारकरी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून निश्चितच मोठे कार्य करणारा असून हिवरखेड परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही रुग्णवाहिका फार मोठा विचार मांडणारी आहे असा विश्वास विद्यावाचस्पती ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केला. रुग्णसेवेचा वसा घेऊन आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड वासियांना समर्पित केलेली रुग्णवाहिका हे आजच्या परिस्थितीतील महत्वाचे कार्य असून आरोग्य शिक्षण या बाबी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे आमदार निश्चितच समाजासाठी दिशादर्शक असतात सा विश्‍वास राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केला

    यावेळी विचारपीठावर कै. विठ्ठल महाराज साबळे यांचे पुत्र ऋषी महाराज साबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार बळीराम सिरस्कार,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आशाताई मिरगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उज्वला राऊत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या छायाताई कापरे ,तालुकाध्यक्ष प्रा प्रदीप ढोले, अशोक महाराज जायले खोले महाराज, गणेश महाराज शेटे रामरतन महाराज वसु व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांची उपस्थिती होती.

       रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील वारकरी मंडळींचा वीणा, वैष्णव वेद गाथा व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आमदार अमोल मिटकरी यांच्या स्थानिक विकास निधी मधून देण्यात आलेली ही वारकरी रुग्णवाहिका निश्चितच रुग्णसेवेसाठी अखंड कार्य करेल असा विश्वास लोकार्पण सोहळ्यात व्यक्त करण्यात आला

                                प्रतिक्रिया

              रुग्णवाहिकेच्या अभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणून हिवरखेड येथे माझ्या विकास निधीतून "वारकरी रुग्णवाहिका" उपलब्ध करून देण्यात दिले आहे. ही जिल्ह्यातील पहिली वारकरी रुग्णवाहिका आहे -अमोल मिटकरी, आमदार विधानपरिषद.