Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देऊळगाव राजा मध्ये शहीद कैलास पवार यांना मानवंदना

Responsive Ad Here

   प्रतिनिधी जळगाव राजा

    बालाजी नगरी देऊळगाव राजा मध्ये शहीद सैनिकाचे सकाळीच पार्थिव येण्याची जागृती 3 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगावराजा विद्यार्थी व संचालक मंडळाने केली व सकाळीच सहा वाजेपासून बस स्थानक चौकामध्ये शिवाजी पुतळा पर्यंत दोन्ही बाजूंनी रांगोळी काढून फुले अंथरली होती त्यामध्ये शिवजयंती उत्सव समितीचे शिवसैनिक मित्र मंडळ राजमुद्रा करियर अकॅडमी महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेट व महाराष्ट्र सैनिक करियर अकॅडमी  देऊळगाव राजा तसेच संचालक मधुकर वाघ रंजन वाघ व भीमराव  चाटे यांनी नियोजन केले व पब्लिक नियंत्रण केले.



 व व्यवस्थितपणे देऊळगाव राजा शहरातून शहीद कैलास भरत पवार यांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात भारत माता की जय अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे वंदे मातरम जय जवान जय किसान या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला देऊळगावराजा शहरामध्ये जालना बायपास पासून कुंभारी बायपास पर्यंत सात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत मोठ्या थाटामाटात रॅली व मिरवणूक मध्ये सर्व देऊळगावराजा वर्षांनी शहीदांचे स्वागत केले