Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमरण उपोषणाची यशस्वी सांगता

Responsive Ad Here

जितेश कारिया हिवरखेड प्रतिनिधी

          आ. अमोल मिटकरी यांच्या पुढाकारातून पत्रकार संघाच्या मागणीला यश                             

               22 वर्षांपासून हिवरखेड नगरपंचायती साठी सुरू असलेल्या अविरत लढ्यात नगरपंचायत निर्मितीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला अनेक संघटनांनी, संस्थांनी व नागरिकांनी सक्रिय समर्थन देऊन एक हजारच्यावर  ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले व हिवरखेड नगरपंचायतसाठी लेखी समर्थन दिले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी

आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई सह्याद्री अतिथीगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हिवरखेड नगर पंचायत विषयक महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करून तसे पञ देऊन नगरपंचायत त्वरित घोषित करण्याची विनंती केली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव नगरविकास यांना हिवरखेड नगरपंचायत बाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. हिवरखेड नागरपंचतीबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आल्याचेही त्यांनी चर्चेतून सांगितले. यावेळी नगरविकास मंत्री यांनी उपोषणकर्ते आणि सहकारी पत्रकार बांधवांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. आणि हिवरखेड लवकरात लवकर नगरपंचायत करण्याचे ठोस आश्वासन दिले. आणि उपोषण सोडण्याची विनंती केली.

    दुसरीकडे अनिलदादा गावंडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी प्रत्यक्ष व्हिडीओ कॉलिंग द्वारे फोन करून दोन महिन्यात हिवरखेड नगरपंचायत करण्याचे आश्वासन दिले. 

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमोल दादा मिटकरी, आणि पालकमंत्री बच्चुभाऊ कडू,  ह्या सर्वांकडून हिवरखेड नगरपंचायत करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेडचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. त्यांनी चण्डिका माता मंदिरात पूजन करून त्यांचा चिमुकला धनुषच्या हाताने प्रसाद ग्रहण करून आपले यशस्वी उपोषण सोडले त्यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघाचे संदीप इंगळे, राजेश पांडव, धीरज बजाज, जितेश करिया, अनिल कवळकार, उमर बेग मिर्झा, सुरज चौबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्तीत होते. या ठोस आश्वासनानंतर आता हिवरखेड वासियांची ऐतिहासिक मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

                                        प्रतिक्रिया

     आश्वासन दिल्याप्रमाणे दोन महिन्यात नगरपंचायत चे आश्वासन मंत्री महोदयांनी पूर्ण करावे आणि हिवरखेड वासीयांचा विश्वास कायम ठेवावा. आश्वासन पूर्ण न केल्यास हिवरखेडची जनता सामूहिकपणे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. अर्जुन खिरोडकार, आमरण उपोषणकर्ता.