Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पथ्रोट ग्रामपंचायत च्या वतीने संदिप अ.वानखडे चा कोरोणा यौद्धा म्हणून सन्मान

Responsive Ad Here

   स्वप्नील वानरे ता.प्रतिनिधी

 समाजाचं आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून प्रेरीत होवून वडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकुण सामाजिक वारसा जपत संपूर्ण देश कोरोणाच्या भीतीने घरात असताना मात्र याला अपवाद संदीप वानखडे या युवकाने पथ्रोट येथील व परिसरातील असलेल्या कोरणा रुग्णाला अमरावती परतवाडा अकोला या ठिकाणी हास्पिटला  नेण्यासाठी स्वतः पुढे येऊन कधी आपल्या टू व्हीलर वर तर कधी ॲम्बुलन्स मध्ये स्वतः चालक बनून आरोग्य सेवा केली. ज्यावेळी एखादा कोरोणा रुग्ण गावाच्या गल्लीत आधळला तर लोक त्या गल्लीत जाण्यास तयार नव्हते परंतु संदीप वानखडे हा कोरणा चे नियम पाळून स्वतः खबरदारी घेऊन रुग्णाला दवाखान्यात पोहोचत असे अश्या मृत्यूशी झुंज असलेल्या आजाराला न घाबरता आत्मविश्वासाने  त्या रुग्णाला आधार दिलासा देत असत. त्यामुळे पथ्रोट परिसरातील संदीप वानखेडे यांचे कौतुक होत असताना. पथ्रोट ग्रामपंचायतीने  स्वातंत्र्यदिनाच्या  दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून असलेले प्रा.गजानन वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते संदिप वानखडे याना   सरपंच,उपसरपंच व पदाधिकारी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. 

    विशेष म्हणजे अशी की संदीप वानखेडे यांचे वडील श्री अंबादास वानखेडे हे पथ्रोट येथील आरोग्य सेवेत  35 वर्ष पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिली आहे. व सेवा सुरू आहे.याच प्रेरणेने प्रेरित होऊन संदीप वानखडे  रुग्णाची सेवा करण्यासाठी तत्पर असतात सध्या चालू असलेल्या लसीकरण केंद्रावर सुद्धा लोकांना लसीकरनाचा त्रास होऊ नये या साठी पथ्रोट लसीकरण केंद्रावर स्वता जाऊन लसीकरण उत्कृष्ट व्हावे या साठी सेवा देतात व ग्रामपंचायत मध्ये सत्कार झाल्या नंतर त्यांच्या मनोगत मध्ये त्यांनी सांगितले की कोरोना काळात सामाजिक बांधीलकी जपत माझ्याकडून जे मला थोडेफार कार्य करता आले याची दखल ग्रामपंचायत व गावकर्यांनी घेतली त्याबद्दल त्याचे आभारी आहे.आरोग्यसेवा करण्याची खरी प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळाली आरोग्य सेवा कसी करायची याचे ज्वलंत उदाहरण माझे वडील आहेत त्यांना माझा हा सत्कार समर्पित करतो मी आरोग्य सेवा देत असताना या कार्यात माझ्या मित्र परिवाराचे मला जे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्याचे सुद्दा आभारी आहे.