Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध :-आमदार राजेश एकडे

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी

        नांदुरा:-आज  जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे होते.आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार राजेश एकडे यांनी यावेळी व्यक्त केले.

      या कार्यक्रमाप्रसंगी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य तथा पातोंडा येथील सरपंच श्री.पुरुषोत्तमभाऊ झाल्टे,श्री.सुभाष पाटील,श्री.नारायण झाल्टे,श्री.बाबूसिंग डाबेराव,श्री.गुलाबराव सोळंके,श्री.समाधान डाबेराव,श्री. गजानन डाबेराव,श्री.अंबादास डाबेराव,श्री.विनोद डाबेराव,श्री.भागवत भोलकर,प्राध्यापक श्री.बुटे सर,सौ.मीनाताई तडवी अध्यक्ष प्रकल्पस्तरीय आढावा समिती यावल,श्री.सुखदेवराव सोळंके राज्य समन्वयक आदिवासी जनता दल,श्री.गोकुळसिंग चव्हाण राज्य समन्वयक आदिवासी जनता दल श्री.दिलीप मोरे राज्य समन्वयक आदिवासी जनता दल व बहुसंख्य आदिवासी बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.