शेख सज्जाद शेख करामत प्रतिनिधी लोणार
सिंदखेड राजा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पिक विम्या ची वरात केंद्र व राज्य सरकारच्या घरात .सिंदखेड राजा तहसील कार्यालयावरअनोख आंदोलन अंदोलना मध्ये लावले केंद्र व राज्य सरकार चे लग्न.
गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असून ,याचा फटका शेतकरी वर्गावर खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे ,त्यामुळे शेतकऱ्याला आपला रब्बी हंगामाचा माल हा अगदी माती मोल विकावा लागला आहे. त्यात यावर्षी पावसाने केलीली अतिव्रष्टी व कंपनीने बोगस बियाणे दिल्याने यावर्षि सुद्धा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे शेतकरी खुप हवालदिल झाला आहे .गेल्यावर्षी शेतकर्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पिक विमा भरला होता, पण तो अद्यापही शासनाने शेतकऱ्या खात्यात जमा केलेली .नाही यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने सिनखेडराजा तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले .
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी ची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी भरलेलेला पिक विमा शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पिक विम्या ची वरात केंद्र व राज्य सरकारच्या घरात हे आंदोलन राजमाता जिजाऊ यांच्या जन्म स्थळापासून ते तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आले या आंदोलनामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या तालावर नाचून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला व तहसील कार्यालय समोर केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे लग्न लावून त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली
जर शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली नाही तर येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यासाठी रस्तयावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे ,उपाध्यक्ष अनिल लांडगे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष भागवत मुर्तडकर, सिंदखेड राजा युवा अध्यक्ष योगेश राठोड ,पवन चव्हाण, समाधान व इतर कार्यकर्त व शेतकरी उपस्थित होते

