Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एकात्मिक बालविकास प्रकल्प लोणार यांच्या वतीने बसस्थानकातील हिरकणी कक्षाचे सुशोभिकरण

Responsive Ad Here

शेख सय्यद शेख करामत प्रतिनिधी 

लोणार :-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून व उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे यांच्या मार्गदर्शनानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त स्थानिक बसस्थानकामधील हिरकणी कक्षामध्ये स्तनपानाच्या माहितीचे पोस्टर्स, ब्यानर्स व माहिती दर्शक तक्ते लावण्यात आले. सदर माहितीचा उपयोग हिरकणी कक्षामध्ये स्तनपान करणाऱ्या मातांना बालकाच्या वाढीसाठी व शारीरिक विकासासाठी होईल या दृष्टीने हिरकणी कक्षाचे माहिती फलक लावून त्याचे प्रदर्शन पंचायत समिती उपसभापती मदन सुटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

   या वेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, बसस्थानक व्यवस्थापक सुनील राठोड, बसस्थानक चौकशी कक्षप्रमुख चव्हान, अंगणवाडी पर्यवेक्षिका कमल केंधळे, भिकाबाई सानप, ज्योती वाघ, विद्या नव्हाळे अंगणवाडी सेविका शोभा भोकरे, तांत्रिक मनुष्यबळ अंकुश धोंडगे उपस्थित होते. तसेच अंगणवाडी स्तरावर स्तनपान सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.