बुलडाणा प्रतिनिधी
दि. 5: सन 2021-22 करीता राज्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गट स्थापना करणे अंतर्गत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. पशुपालकांनी संबंधित राज्यातील परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्या करीता सन 2021-22 करीता 50 टक्के अनुदानावर बुलडाणा व मोताळा तालुक्याची निवड झाली आहे.
योजनेतील उदिष्टे नुसार निवड समिती मार्फत प्रती तालुका 1 लाभार्थ्यांची निवड करावयाची असल्याने, सर्व प्रवर्गातील इच्छुकांकडून तालुक्यामधून पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती स्तरावर उपलब्ध असलेले अर्ज दिनांक 10 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत दोन प्रतित अर्ज पशुसंवर्धन विभाग, पशूधन विकास अधिकारी (वि), पंचायत समीती स्तरावर सादर करावे. सदर पशुपालकाकडे स्वताःची 2500 चौ.फुट जागा दळणवळण , पाण्याची व्यवस्था व विद्यूती करणाची सुविधा असावी.सदर योजनेमध्ये प्रकल्पाची किंमत 10 लक्ष 26 हजार असुन प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शक सुचना व शासन निर्णया नुसार पुर्णता कार्यान्वीत झाल्या नंतर 50 टक्के अनुदान रूपये 5 लक्ष 13 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण (DBT) करण्यात येणार आहे. या बाबतची सविस्तर माहीती पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती यांच्याकडे उपलब्ध आहे.या योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.पी.जी.बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा यांनी केले आहे.