देवानंद नेमाने प्रतिनिधी
नांदुराः शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळख असलेल्या तालुक्यातील चांदुर बिस्वा येथील यशवंत हायस्कूल व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यायाम शाळेचे उदघाटन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते सदभावना दिनाचे औचित्य साधून एका शानदार कार्यक्रमात मोठ्या थाटात संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.व्ही.आर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून विधीज्ञ श्री.सुजीत इंगळे,श्री.राजेश भागवत आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती .
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन तसेच सदभावना दिनानिमित्त स्व.राजीव गांधीजी यांच्या स्मृतीना उजाळा देत त्यांच्या तैलचित्राचे विधीवत पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. व्यायामशाळेच्या उदघाटन प्रसंगी
आ.राजेश एकडे युवकांना संबोधित करतांना म्हणाले की युवकांनी या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत व्यायामासारख्या चांगल्या सवयी अंगीकाराव्या जेणेकरून शारीरिक कसरतीमुळे आपल्यात सकारात्मक उर्जेचा संचार होऊन एक सुदृढ युवक म्हणून आपण बलशाली राष्ट्र उभारणीसाठी आपले महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.डी एस कोलते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थ्यांनीनी अथक परीश्रम घेतले.

