जामनेर प्रतिनिधी
जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच पंचायत समिती सदस्य दिलीप श्रीपत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
जामनेर विधानसभा मतदारसंघातील जामनेर तालुका शिवसेना बैठकीत जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विलास जी पारकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले की पदाची अपेक्षा न ठेवता शिवसैनिक हेच पद शिवसेनेत महत्वाचा आहे जाती-धर्म पाहून पद मिळत नाही कर्तत्व निर्माण करा आज मुस्लिम समाज बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो जामनेर संघटना बांधण्याचे आहे सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे बळ वाढवा संघटना मजबूत करणे हे व्हिजन आहे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे आपल्या मतदार संघात शिवसेना मेळाव्यासाठी येणार असून या मेळाव्यासाठी आतापर्यंत सर्व शिवसैनिकांनी तयारी करावे या जामनेर विधानसभा मतदारसंघात मी जास्त लक्ष देणार आहे आपल्यातील मतभेद विसरून संघटना मजबूत करावे असे आव्हान यावेळी केले याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी शिवसेना बैठकीला मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसेना जामनेर तालुका बैठकीला सुरुवात करण्यात आली.
या तालुका बैठकीत जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी पंचायत समिती सदस्य दिलीप पाटील पहूर येथील गणेश तायडे गणेश वानखेडे व 50 मुस्लिम कार्यकर्त्यांनी विलास जी पारकर चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला शिव संपर्क अभियानांतर्गत आज सकाळी दहा वाजता शेंदुर्णी येथे वाडी दरवाजा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले तसेच वडगाव बुद्रुक येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील यांनी केले याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे जिल्हा उपसंघटक सांडू गुरव सुधाकर सराफ सुकलाल बारी शहर प्रमुख अतुल सोनवणे न्यानेश्वर जंजाळ शहर प्रमुख संजय तायडे विलास पाटील भैय्या गुजर तुकाराम गोपाल दिपक माळी पवन माळी कैलास माळी मोहन जोशी रमेश बनकर अरुण पाटील सुरेश मिस्त्री साडुतडवी रिजवान मन्यार विलास मांडे विलास देशमुख संजय देठे अल्पसंख्या संघटक युनुस शेख आमीन शेख उस्मान भाई यांच्यासह शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
