संजय पवार प्रतिनिधी अमरावती
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने अमरावती पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे .मिळालेली माहितीनुसार अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये सागर श्रीपद ठाकरे (वय 24 राहणार खबीत, तालुका, आष्टी जिल्हा वर्धा) या युवकावर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होता ,पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सदर मुलीला परत आणले ,त्यानंतर मुलींच्या तक्रारीवरून सागर वर बलात्कारांच्या कलमानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सागरला अमरावतीमध्ये बोलविले व त्याला अटक केल.
फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये लॉकअप ची व्यवस्था नसल्यामुळे सागर ला काल राजापेठ पोलिस स्थानकातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले, त्यानंतर मध्यरात्री च्या सुमारास मध्ये सागर ने आपल्या शर्ट च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ,आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे ,शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर तसेच सीआयडीचे अधीक्षक अमोल गावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली ,घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
