Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड नगरपंचायत घोषणेसाठी नगरविकास मंत्र्यांना साकळे

Responsive Ad Here

प्रतिनिधी  जितेश करिया

                               आज उपोषणाचा तिसरा दिवस, उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली

    हिवरखेड :- हिवरखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत कींवा नगरपरिषद मध्ये होण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पत्रकार संघाच्या वतीने अर्जुन चिंतामण खिरोडकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे.नगरपंचायतीची घोषणा करण्यासाठी उपोषणकर्त्यांच्या वतीने सरळ नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना साकळे घालण्यात आले आहे.

हिवरखेड ही जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथील लोकसंख्या चाळीस हजाराच्या वर आहे. त्यातूलनेत गावाच्या विकासाची गती मंद असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी येथे नगरपंचायत होणे अत्यावश्यक आहे. हिवरखेड नागरपंचायतिचा लढा गेल्या बावीस वर्षांपासून सुरू असून या लढ्यात अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी

   सामाजिक संघटना, पत्रकार संघटना यासह अधिकारी वर्गाचाही सक्रिय सहभाग आहे गेल्या बावीस वर्षांपासून अविरत सुरू असलेला हा लढा आता अंतिम चरणात असून मंत्रालया कडून वारंवार सुचविलेल्या सर्वच त्रुट्या आता पूर्ण करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार अर्जुन खिरोडकर यांनी दिनांक १५ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले असून या मार्फत नगरविकास मंत्रालयाकडून हिवरखेड नगरपंचायतीच्या प्राथमिक उद्घघोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपोषणस्थळी स्थळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्याअसून आपला जाहीर पाठिंबा दिला आहे तर अनेक नागरिक साखळी उपोषण देखील करीत आहेत. अर्जुन खिरोडकार यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

नगरविकास मंत्रालयाकडून तात्काळ प्राथमिक उद्घघोषणा करून उपोषणाची सांगता करावी अशी मागणी हिवरखेड वासीयांकडून होत आहे.

   हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी मी पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनापासून आमरण उपोषण करीत आहे शासनाकडून सुचविलेल्या त्रुट्या पूर्ण करून त्रुट्यारहित संपूर्ण अहवाल नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. म्हणून नगरविकास मंत्रालयाकडून नगरपंचायतीची घोषणा करण्यात यावी ही माजी मागणी असून घोषणा होईपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. अर्जुन खिरोडकार, पत्रकार उपोषणकर्ता