प्रतिनिधी बुलढाणा
बीबी येथील जवान किशोर काळुसे यांच्यावर 5 ऑगस्ट रोजी बीबी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला 4 ऑगस्ट रोजी दुपारी किशोर काळुसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला 5 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील इंडियन आर्मीच्या वाहने त्यांचे पार्थिव दुपारी 3 वाजेच्या सुमारास बेबी येथे आणण्यात आले यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गाव स्वच्छ करून महिलांनी पार्टी जाण्याच्या मार्गावर रांगोळी काढली होती त्यांच्या राहत्या
घरून अंतयात्रा गावातील मुख्य रस्त्याने निघून बस स्टँड परिसरात स्मशानभूमीत पोहोचते किशोर यांच्या पार्थिव ठेवलेल्या रथावर चौ बाजूने पुष्पवर्षाव होता ग्रामपंचायत व गावातील सर्व तरुण मंडळींनी तसेच मांडवा येथील मुलांनी तो परिसर स्वच्छ करून ठेवला बीबी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून किशोर काळुसे यांना श्रद्धांजली अर्पण केली व सर्व व्यापारी वर्ग अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होते 3 वर्षे मुलगी शेजल व भाऊ नूतन काळुसे यांनी जवान किशोर काळुसे यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिली
अहमदनगर येथील आर्मी च्या अधिकाऱ्यांनी जवान किशोर काळुसे यांना सलामी दिली यावेळी परिसरातील सर्व पक्षाचे नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक व बीबी येथील नागरिक महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती किशोर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आमदार स्मशानभूमी परिसर शहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी दणाणून गेला आलेल्या सर्व मान्यवरांनी किशोर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन दर्शन घेऊन शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला
