Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे साडेबारा लाखाचा दरोडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील घटना

Responsive Ad Here

पहूर, ता  जामनेर (प्रतिनिधी )

  राजस्थान येथे फिरायला गेलेल्या पहूर येथील भुसार माल व्यावसायिकाच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी साडेबारा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली . पहूर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणारे  अनिल रिखबचंद कोटेचा हे कुटूंबियांसोबत २५ ऑगस्ट पासून पर्यटनासाठी गेले असता बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सत्तेचाळीस तोळे सोने , ५०० ग्राम चांदी ,तसेच २लाख ९० हजार रुपयांची रोकड  असा एकूण साडे १७ लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला .



   चोरट्यांनी प्रथम घरा बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे  फोडून दरवाजाचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला .घराची झाडाझडती घेऊन कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटात ठेवलेली रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले . या घटनेची वार्ता  पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कोटेचा  यांना समोर गोडाउन मध्ये काम करणाऱ्या हमालांनी दिली . त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले . 

   याबाबत त्यांनी पहूर पोलिस ठाण्यात माहिती दिली . पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला . घटनास्थळी जळगाव येथील श्वान पथकासह ठसे  तज्ञांनी भेट दिली . याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे . पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहेत .