अंबड तालुका प्रतिनिधी हारे
अंबड तालुक्यातील वडीगोद्री ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम सुरक्षा रक्षक ( पोलिस मित्रांचा ) शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सरपंच रत्नप्रभा पंढरीनाथ खटके यांच्या हस्ते ग्रामसुरक्षा रक्षक दलास टिशर्ट साठी पाच हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली.हि रक्कम पोलिस मित्र किर्तीनंद गांगुर्डे व हरीचंद्र गावडे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. ग्राम सुरक्षा रक्षक दलांनी म्हणजेच पोलिस मित्र करत असलेले काम कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. यावेळी अंबड पं.स. सभापती श्री. बापूराव खटके, पंढरीनाथ नाना खटके,( माजी संचालक कर्मयोगी अंकुशरावजी टोपे समर्थ
सहकारी साखर कारखाना,अंकुशनगर ) ग्राम विकास अधिकारी एन.जी.गांडगे, माजी सरपंच श्री. दीपक पवार, मनसे जिल्हाध्यक्ष श्री. बळीराम खटके, उपसरपंच श्री. आण्णासाहेब काळे, ग्राम पंचायत सदस्य श्री. नारायणराव वायाळ, श्री. बाबासाहेब बोबले, रोहिदास पवार, विजय शिंदे, अभिषेक पवार, अभिजित खटके, उमेश काळे, श्री. पंडितराव गावडे, राष्ट्रवादी वक्ता सेल जिल्हाध्यक्ष श्री. ऍड सचिन पवार, श्री.नरेंद्र गाढवे, श्री. कुलदीप आटोळे श्री.राजेंद्र पवार व वडीगोद्री गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यामुळे सर्व गावकऱ्यांच्या वतीने ग्रामसुरक्षा रक्षक दलाचे अभिनंदन करण्यात आले.
