Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आजादी का अमृत महोत्सव जागर यात्रेचे मैत्री सेवा फाऊंडेशन च्या वतीने स्वागत व पटनाट्य चे आयोजन

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी


 भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, अंतर्गत गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात दि.२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान ही जागर यात्रा फिरत आहे.

या जागर यात्रेचे गावागावात स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वर एरंडोल शहरात या जागर यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.यात भारत सरकारच्या गित व नाटक विभागाची मान्यता प्राप्त कलासंस्था दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी सचिन महाजन व सहकारी यांच्या कलापथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करण्यात आला तसेच देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला.

      या कार्यक्रमास गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी  मैत्री सेवा फाऊंडेशन चे सागर महाजन , करण पाटील , पियुष चौधरी , ज्ञानेश्वर महाजन , शुभम महाजन ,संतोष जैस्वाल ,जयेश पाटील मनोज महाजन आदी उपस्थित होते.त्यांनी कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी   परिश्रम घेतले, तसेच भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव यांचे देखिल या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.या कार्यक्रमात पियुष चौधरी सूत्रसंचालन केले आणि आभारही व्यक्त केले.