अंबड ता प्रतिनिधी हारे
ऑप्टेक नेत्र रुग्णालय औरंगाबाद व ग्राम पंचायत अंतरवाली सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरवाली सराटी येथे नेत्र तपासणी शिबिर मंगळवार (ता.२४ ) रोजी आयोजीत करण्यात आले होते. या शिबारात गावातील १०० ग्रामस्थांनी नेत्र तपासणी करून घेतली.यातील ६ नेत्र रुग्णांना ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला तर ६० रुग्णांना अल्प दरात नंबरचा चष्मा देण्यात येणार आहेत.
या वेळी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.या शिबिरात ऑप्टेक रुग्णालयाचे डॉ.अमीत वांगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अश्विनी राठोड,शिवाजी शिंदे ,शशीकला शिंदे ,अंजली वानखेडे ,अरूणा पवार यांनी या ठिकाणी रूग्णांची तपासणी केली. या वेळी सरपंच देविदास डोंगरे,उप सरपंच मीराबाई तारख, वि.का.सेवा सहकारी सोसायटीचे सचिव भागवत तारख , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, ग्रामसेवक सुरेश धोत्रे, भुजंगराव सुराशे, किशोर भा.दखने आदी या वेळी उपस्थित होते.
