Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मंगरूळ चव्हाळा येथील फॉरेस्ट ऑफिस देव भरोसे

Responsive Ad Here

अमरावती प्रतिनिधी

           मंगरूळ चव्हाळा येथील फॉरेस्ट विभागाच्या वनरक्षक यांची बदल गेल्या पंधरा दिवसा पासून झाली आहे वनरक्षक नसल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणी मध्ये सापडलेला आहे नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत येणारे सालोड कसबा या गावाची शेती पूर्ण वन विभागाच्या क्षेत्र 400 ते 500हेक्टर  इतकं मोठं आहे या भागामध्ये नीलगाय ची संख्या हजाराच्या वरती आहे तसेच  रानडुक्कर या प्राण्यांची संख्या पण जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयाचं नुकसान होत असते जी मदत वन विभाग शेतकऱ्यांना देते ते खूप कमी प्रमाणात मदत मिळते .

    तसेच भरपाई साठी ऑनलाइन फॉर्म भरावे लागते त्यासाठी शेतामध्ये पंचनामे नोंदविण्या करिता वन कर्मचारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यासाठी लवकरात लवकर वन कर्मचारी उपलब्ध करून द्यावे तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद आहे आमचे अर्ज ऑफलाईन स्विकरण्यात यावे तसेच वनरक्षक ची नेमणूक होईपर्यंत तलाठी कृषी सेवक पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करत आहे  मुख्य वन अधिकारी यांना निवेदन देतेवेळी येत्या सोयाबीन काढण्याचं वेळ जवळ येत आहे .8दिवसाच्या आत वन रक्षकांची नेमणूक करण्यात यावी व पंचनामे नोंदविण्यात यावे नाहीतर आम्ही पूर्ण शेतकरी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करू असा इशारा पण दिला त्याचप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा प्राण्यांनी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले तरीसुद्धा आतापर्यंत मदत देण्यात आलेली नाही त्यानिमित्त आज सालोड कसबा या गावातील शेतकऱ्यांनी मुख्य वनरक्षक अधिकारी जोयोती बॅनर्जी यांना निवेदन देण्यात आले तसेच जिल्हाधिकारी पवनीत कोर यांना सुद्धा निवेदन देण्यात आल.

 निवेदन देते वेळी सालोड येथील सरपंच रोशना जगदीश ढगे .तसेच सविता नेवारे माजी सरपंच सालोड .अंकुश निमणेकर .उत्कर्ष धांडे, .सविता लीलेश्वर नेवारे .संगीता प्रकाश वेळूकर, इंदिराबाई सहारे ,गजानन राऊत, अक्षय सहारे,रामहरी राऊत,शंकर कुसराम ,व इतर शेतकरी उपस्थित होते.