गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
दिनांक 14-9-21 रोजी पशुसंवर्धन विभाग जि.प.जळगाव पंचायत समिती एरंडोल व प.वै.द.श्रेणी 2 रिंगणगाव अंतर्गत खर्ची बु.ता.एरंडोल येथे कार्य मोहीम शिबिर घेण्यात आले त्यात घटासर्फ 250 फऱ्या 150 लसीकरण,कृत्रिम रेतन1,गर्भ तपासणी 72 वांझ तपासणी 92,गोचीड गोमाशी निर्मूलन 260, जंत निर्मूलन260,औषधोपचार 160जनावरांवर करण्यात आले तसेच साथीचे आजार व त्या बाबत घ्यावयाची काळजी,लंपी
आजार होऊ नये या विषयी प्रतिबंधात्मक उपाय इ.बाबत डॉ.अशोक महाजन पशुवैद्यकीय अधिकारी एरंडोल यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन करून शंकाचे निरसन केले सदर शिबिर श्री.नानाभाऊ महाजन जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले प्रसंगी सरपंच सौ.आशाबाई माळी,श्री.योगेश चव्हाण,बापू माळी,विठ्ठल माळी,अर्जुन ढेंगे,दगडू माळी व पशुपालक उपस्थित होते.
शिबिर यशस्वी ते साठी तालुक्यातील सहायक. पशुधन. विस्तार. अधीकारी श्री.चींचोरे,श्री.सोनवणे तसेच पशुधन पर्यवेक्षक श्री.राहुल साळुंखे,हेमंत नागने,श्री.तायडे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..
