Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोरगाव येथील पूल नाल्याचे काम सहावर्षापासून पडले रखडत

Responsive Ad Here

जालना शहर प्रतिनिधी सुभाष डोके.  

  भाजपाचे माजी आमदार यांनी बोरगाव येथील  मतदारांना बबनराव लोणीकर आमदार साहेब गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आश्वासन देऊन बोरगाव ते कोळवाडी यामधील नदीच्या फुलाचे काम करून देऊ असे सांगितले होते व सदर फुल बनवण्याचे साहित्य  येऊन सहा वर्षे झाले आहेत तरीही अद्याप पर्यंत काम झालेले नाही ते तसेच रखडून पडलेले दिसून येत आहे बोरगावचे 50 टक्के शेतकरी या नदी पार करून पलीकडे जावा लागते परंतु पावसाळ्याच्या दिवसात हे शक्य  नाही गेल्या कित्येक वर्षात हाल होत असल्याचे दिसून येत आहे ह्या फुलाचे काम होणार की नाही .

        असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये तसेच बोरगाव ते कोळवाडी ह्या गावात निर्माण झालाय आहे सदर नदीतून जाणे-येणेकरणारे शेतकरी व दोन्ही गावचे लोक ह्या नाली पुलाचे काम होणार की नाही असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला आहे या लोकांचे होणारे हाल पाहता माननीय आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब यांनी या रखडलेल्या पुलाचे काम सुरू करून द्यावे अशी बोरगाव कोळवाडी या शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे आमदार साहेबांनी मतदार तसेच येथील शेतकऱ्यांचा विचार करून सदर पुलाचे काम करून द्यावी अशीही मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.