शेख सज्जाद शेख करामत प्रतिनिधी लोणार
दिनांक 31 ऑगस्ट रोजी देऊळगाव कुंडपाळ तालुका लोणार येथील महिलानि लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांना निवेदन दिले. थोडक्यात निवेदनाचे स्वरूप असे की मौजे देऊळगाव कुंडपाळ तालुका लोणार येथील श्री रमेश हरिभाऊ चव्हाण (एस टी ड्रायव्हर कर्मचारी) व प्रकाश गोपा राठोड हे गावात अवैद्य दारू विक्री करतात या अवैद्य दारू विक्रीमुळे अनेकांच्या कुटुंबात पुरुषांना,
वय 15 ते 20 वर्षातील मुलांना दारूचे व्यसन जळले आहे, त्यामुळे अनेकांच्या कुटुंबात शांतता न राहता वाद-विवाद, भांडण- तंटे होत आहे. त्याच्यावर कुठेतरी आळा बसावा त्या करीत गावातील महिलांनी लोणार पोलीस स्टेशन ला निवेदन दिले, सौ अलका जंगलसिंह राठोड, ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदाबाई परमेश्वर राठोड, सौ सुलाबाई उत्तम राठोड, सौ शिल्पा कैलास राठोड, सौ मथुरा त्रिंबक राठोड, सदर गावातील 400 ऊन अधिक महिलांनी निवेदनावर स्वाक्षरी करून दारूबंदी करण्याकची मागणी केली आहे,
