Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बालगृहात वाढदिवस साजरा

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल येथिल कर्तव्यदक्ष  तहसीलदार श्रीमती. सुचिता चव्हाण मॅडम* यांचा मुलगा चि.विहान याचा वाढदिवस सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत खडके बु येथिल अनाथ, निराधार मुलां मुलींच्या बालगृहात साजरा केला. मॅडमांनी या बालकांच्या समश्या आस्तेवाईक पणे जाणून   घेतल्या .वाढदिवसाच्या निमित्ताने या बालकांची भेट झाली त्यामुळे फारच आत्मिक समाधान वाटले .संस्थेतील बालकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने   शुभेच्छा दिल्या.नंतर मैत्री सेवा फाऊंडेशन च्या वतीने आयोजित  जागतिक योगादिनानिमित्त सर्व बालकांनी ऑनलाईन कार्यक्रम सादर केला होता त्या प्रमाणपत्रांचे देखिल वितरण करण्यात आले.

     वाढदिवसानिमित्त बाहेरचे काहीही न आणता बालकांसाठी वरण ,भात, पोळी, पनिरभाजी, पापड ,मोहनथाल असे रुचकर भोजन दिले. कार्यक्रमासाठी परिवारातील सर्व सदस्य श्री. सागरजी आहेर साहेब,श्री. शरद राव चव्हाण सर,सौ.शुभांगी चव्हाण मॅडम,कु.अनन्या आहेर , राहुल तिवारी ,सौ.अर्चना तिवारी ,श्री.शशिकांत महाजन उपस्थित होते. राहुलभाऊ तिवारी यांनी बालकांचे हित पाहुन सर्व नियोजन करुन  मोलाचे सहकार्य केले. संस्थाचालक दादा सो.प्रभाकर पाटील यांनी  वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे  मनस्वी आभार मानले.आणि *चि.विहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या 

कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे ,प्रमोद पाटील ,तुषार अहिरे ,गणेश पंडीत, ज्ञानेश्वर पाटील,सौ.अरूणा पंडीत, यांनी परिश्रम घेतले.