भीमराव चाटे
" यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"
जेथे स्त्री जातीची पूजा होते तेथे देवता निवास करतात आणि जेथे कन्या बहिण आई पत्नी या चार रूपातील नारीला दुःख कष्ट पीडित किंवा किरकीर असेल तेथे लक्ष्मी नांदत नाही. घरात मुलगी जन्माला येण ही भाग्याची गोष्ट आहे या भुतालावर निसर्गाने स्त्रीला अफाट शक्ती दिलेली आहे. सहनशक्ती दिलेली आहे. म्हणूनच म्हटलं जातं मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही. म्हणून नारी शक्तीचा सत्कार करायला हवा. आज घरा घरामध्ये सर्व लहान-मोठे कामे करताना आढळून येतं की बापाला पाण्याचा ग्लास कोण भरून देते, मुलगा या मुलगी ? घरातील औषध गोळ्या जबाबदारीने कोण आणून देते ,मुलगा का मुलगी?
25 सप्टेंबर जागतिक कन्या दिवसानिमित्त आवर्जून सांगावेसे वाटते घर आणि समाजातल्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे काळजीपूर्वक करणारी आपली कन्या असते. मोबाईलवर कन्या दिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यापेक्षा आपण1 मुलगी 2आई 3पत्नी 4बहीण याच रूपातील विश्वातील हे मुख्य पात्र आहेत त्या कुणाच्या आणि कोणाच्या कन्या आहेत त्यांना आदराची सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे.
मुलीचं हृदय फार कोमल असतं त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विचार करावा तेव्हा तुमच्या प्रत्येकाचा संसार सुखाचा झालेला असेल. जागतिक कन्या दिवसानिमित्त तुम्ही मुलीला भेटवस्तू द्या , तिच्या काही इच्छा पूर्ण करा. मी माझ्या मुलींना बेटा म्हणून आवाज देतो कारण मुलाचा हव्यास न धरता मी दोन मुलीवरच खुश आहे दोन्ही पती-पत्नी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे कारण मी सैन्यात 1995 ला भरती झालो 2001 लग्न झालं लग्नानंतर आठ वर्षानंतर म्हणजे सर्विस च्या तेराव्या वर्षी गायत्री नावाचे कन्यारत्न प्राप्त झाल, सर्विस चा 13 व्या वर्षापर्यंत लोकांनी काय काय म्हटलयाचा विचार केला नाही मनाला टोचायचे पण या कन्या ने आम्हाला आई बाप बनवलं ,
म्हणजे आम्हाला जन्माला घातलं. मुली कधी आई बापाला सतावत नाहीत ,जे दिलं ते स्वीकारतात. माझ्या मुली " मुलगी वाचवा मुलगी शिकवा " रांगोळी काढतात मॅराथॉन करतात पाच किलोमीटर पळून बक्षीस घेतात देऊळगाव राज्यातील पहिली लहान कन्या पाच किलोमीटर धावुन बक्षीस घेते , सकाळची पीटी करते , सकाळीच पप्पाला लवकर उठवते, पाणी तपावते ,स्वयंपाक करून देते, एन सी सी प्रॅक्टिस करते, केकच्या ऑर्डर घेते, केक चे प्रशिक्षण देते. माझ्या मुली मार्क वान नाहीतर गुणवान आहेत . ऑल राऊंडर आहे प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घेऊन काम करतात. मेरी बेटीया मेरा अभिमान है. जय हिंद
एक दिवसाचा प्रेरक प्रसंग आम्ही देऊळगाव राजा बस स्थानक जवळून रात्री नऊ वाजता घराकडे परतत होतो. फोरविलर चालवत असताना माझे लक्ष रोडवर होते परंतु समोरच्या सीटवर ताबा करणारी माझी दहा वर्षीय जयश्री बेटाच्या लक्षात एक गोष्ट आली. बस स्थानकातून बस हळुवार बाहेर पडत असताना मागच्या शिडीवरून बसच्या छतावर जाऊन एक व्यक्ती लपलाय,( सैन्यात फील्ड मध्ये पोस्टवर फॅमिली कॉर्टर वरच्या पोस्ट वरील बंदुकधारी सोबत राहणाऱ्या मुली सकाळच्या फायरिंग रेंजच्या बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून उठणार्या मुली पप्पाला खोटं बोलताय असं वाटलं) पण नाही पप्पा खरोखरच एकदा बस थांबवून बघाना सेकंदात बऱ्याच अघटित घटनांचा विचार केला व मुलीचे म्हणणे खरे आहे असे समजून बसला ओव्हरटेक केले.
लिंबारा परिसरामध्ये बस अडवल्यामुळे अपघात झाला की काय असे समजून भगवान बाबा चौकातील गप्पा मारणाऱ्या मुलांची गर्दी झाली काय झालं साहेब काय झालं साहेब काय झालं, बस वाल्यांनी कट मारला का? नाही नाही एक शंका आहे ती क्लिअर करायची आहे, वाहक आणि चालकांना विनंती करून आमच्या छोट्याशा दहा वर्षीय जयश्री चाटे च असं म्हणणं आहे तुमच्या बसवर कोणीतरी लपलाय गाडी ची तपासणी केल्यावर बघतात तर काय एक झिंगाट लेला इसम सापडला प्यायला पैसे होते तिकीट ला नाही म्हणून बसवर लपलेला, ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी जयश्री कन्या चे धन्यवाद व्यक्त केले व म्हणाले बाळा तू सैनिकाची मुलगी आहे निडर धैर्यवान आहेस म्हणून आज आमच्या लाल परी ला कलंकित होण्यापासून वाचवले अन्यथा हा झिंगाट लेला व्यक्ती पुढच्या वळण रस्त्यावर स्पीड मध्ये बस च्या छतावरून खाली पडला असता आणि त्याचा जीव गेला असता, तू एक जीव वाचविलास " धन्य तुझे माय बाप " जागतिक कन्या दिवसानिमित्त 23 सप्टेंबर ला जन्मलेल्या जयश्री चाटे च्या पप्पा कडून जगातील सर्व मुलींना जागतिक कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जय हिंद सैनिक डायरी क्रमशः
